Wagholi : वाघोलीत पहाटे इमारतीच्या डक्टला आग

एमपीसी न्यूज – वाघोली येथील उबाळे नगर (Wagholi) येथील ऑरा कंट्री सोसायटीमध्ये पाचव्या मजल्यावर डक्ट मध्ये आग लागली होती. ही आग पहाटे 4 च्या सुमारास लागली होती. मात्र अग्निशमन दलाने तत्परता दाखवत आग विझवून आटोक्यात आणली.

वर्दी मिळताच घटनास्थळी पीएमआरडीए वाघोली अग्निशमन दल केंद्राचे वाहन पोहचले. यावेळी अग्निशम दलाच्या जवानांनी सर्व प्रथम बाजूला असलेल्या घरांना सुरक्षित केले. वेळेत पोहचल्याने आग त्वरीत आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टळला. सुदैवाने आगी वरती कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. यावेळी आगीचे कारण मात्र कळू शकलेले नाही.

Chinchwad : नववर्षानिमित्त सामाजिक विषयांवर जनजागृती करत एका कुटुंबाने केला जम्मू ते पुणे सायकल प्रवास

ही कार्यवाही अग्निशमन जवान वाहन चालक अल्ताब पटेल, फायरमन- संदीप तांबे, प्रकाश मदने, सचिन गवळी, महेश पाटील, रिजवान फरास यांनी पार पाडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.