Khandala : ट्रक चालकाची सतर्कता आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे चार वर्षीय मुलगा परतला घरी

एमपीसी न्यूज – खंडाळा घाटातून  (Khandala) रिक्षातून जात असताना चार वर्षीय मुलगा रस्त्यावर पडला. त्यानंतर पाठीमागून आलेल्या ट्रक चालकाने सतर्कता दाखवत मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनीही प्रयत्न करत पालकांचा शोध घेत त्याला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात दिले.

निखिल काळे (वय 4) असे या मुलाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी निखिल हा पालकांसोबत मांढरदेवीच्या दर्शनासाठी गेला होता. देवीचे दर्शन घेऊन निखिल हा कुटुंबीयांसोबत रिक्षातून घरी जात होता. खंडाळा घाटात आल्यानंतर एका वळणावर निखिल रिक्षातून खाली पडला. मात्र ही बाब कोणाच्याही निदर्शनास आली नाही.

खंडाळा घाटापासून पुढे तब्बल 80 किलोमीटरचे अंतर कापून ठाणे येथे गेल्यानंतर निखिल आपल्यासोबत नसल्याची बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी (Khandala) शोधा शोध सुरू केली. दरम्यान खंडाळा घाटातून लक्ष्मण जाधव हे ट्रक घेऊन जात होते. रस्त्याच्या बाजूला लहान मुलगा रडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ट्रक थांबवून त्याची विचारपूस केली. मात्र घाबरलेल्या निखिलला काहीही सांगता आले नाही.

Wagholi : वाघोलीत पहाटे इमारतीच्या डक्टला आग

त्यामुळे लक्ष्मण जाधव यांनी त्यास खोपोली पोलीस ठाण्यात नेले. खोपोली पोलिसांनी निखिल बाबत सोशल मीडियावर संदेश प्रसारित केला. सोशल मीडियावरील संदेश निखिलच्या पालकांपर्यंत पोहोचला. त्यांनी तात्काळ खोपोली पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर पालकांनी खोपोली पोलीस ठाण्यात येऊन निखिलला ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.