Zomato Pay : झोमॅटो पेला आरबीआयची मान्यता

एमपीसी न्यूज – झोमॅटोची उपकंपनी असलेल्या झोमॅटो पेमेंट्स या (Zomato Pay) कंपनीला रिझर्व बँकेकडून पेमेंट्स ॲग्रीगेटरचा परवाना मंजूर झाला आहे. यामुळे आता झोमॅटोला ई- व्यापार आणि त्या संबंधाने देयक व्यवहाराची पूर्तता करता येईल.

रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून 24 जानेवारी रोजी झोमॅटोला पेमेंट्स ॲग्रीगेटरचा परवाना प्राप्त झाल्याचे कंपनीने सांगितले. टाटा पे, रेझर पे, कॅश फ्री या कंपन्यांच्या पंक्तीत आता झोमॅटो पे ही कंपनी देखील सहभागी झाली आहे.

Khandala : ट्रक चालकाची सतर्कता आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे चार वर्षीय मुलगा परतला घरी

झोमॅटो कंपनीने स्वतःची युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवा सुरू केली होती. यासाठी कंपनीने आयसीआयसीआय बँकेची सामंजस्य करार केला होता. झोमॅटो ही हॉटेल रेस्टॉरंट मधून ग्राहकांना खाद्यपदार्थ पुरविण्याचे प्रामुख्याने काम करते. या कामाचा मोबदला ऑनलाइन माध्यमातून गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या त्रयस्थ पेमेंट ॲग्रीगेटर कंपन्यांद्वारे स्वीकारला जात होता. मात्र या कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी झोमॅटोने स्वतःची यूपीआय सेवा सुरू केली आहे.

त्रयस्थ पेमेंट्स कंपन्यांकडून होणाऱ्या व्यवहारासाठी लागणाऱ्या शुल्कात बचत करण्यासाठी देखील झोमॅटो पेचा ग्राहकांना फायदा (Zomato Pay) होणार आहे. झोमॅटोकडे नोंदणीकृत असलेल्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये पेमेंटच्या इतर पर्यायांसह झोमॅटो पेद्वारे पैसे देण्याचा पर्याय देखील उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.