Chinchwad Bye-Election :  भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा बुधवारी रोड-शो

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ (Chinchwad Bye-Election) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या (बुधवारी) रोड-शो आणि सायंकाळी जाहीर सभा होणार असल्याची  माहिती शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

सायंकाळी साडेचार वाजता वाकड येथून मुख्यमंत्री शिंदे यांच्या रोड-शो ला सुरुवात होईल. उत्कर्ष चौक  दत्तमंदिर जवळ वाकड  – वाकड रोड  – डांगे चौक – दत्तनगर जुना जकात नाका -चापेकर चौक –एल्प्रो मॉल  – पॉवर हाउस चौक – केशवनगर – एम एम हायस्कूल काळेवाडी –  कुणाल हॉटेल – नखाते ऑफिस – विमल गार्डन समोरून – शिवेंद्र लॉन्स असा रोड-शो चा मार्ग असणार आहे.

Mahavitaran : निवृत्ती वेतन योजनेसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले जाणार आहे. रहाटणी, तापकीर मळा येथील शिवेंद्र लॉन्स येथे सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होईल. (Chinchwad Bye-Election) मुख्यमंत्री शिंदे यांच्या रोड-शो आणि सभेला  शिवसेना-भाजप-मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.