Pimpri News : मानवतावाद हा शिवरायांच्या व्यक्तिमत्वामधील विशेष गुण – विजय गायकवाड

एमपीसी न्यूज : अडचणीत व संकटात असलेल्या रयतेकडून महसूल न स्विकारणे उलटपक्षी त्यांना मदत करणे हा छत्रपती महाराजांमध्ये मानवतावाद दर्शविणारा विशेष गुण होता, असे प्रतिपादन पुरोगामी विचारवंत शिवश्री विजय गायकवाड यांनी केले. संत तुकाराम नगर येथील (Pimpri News) राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे शिवजयंती निमित्त मराठा सेवा संघ व इतर विविध संघटनाच्या वतीने सोमवारी शिवजयंती निमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष अँड लक्ष्मण रानवडे होते . शिवव्याख्याते अरविंद जगताप , तसेच मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . त्यांनी दिप प्रज्वलित करून व्याख्यानमालेचा शुभारंभ केला. गायकवाड पुढे म्हणाले , छत्रपतींच्या राज्यात कोणताही जाती भेद पाळला जात नसे, चुक करणाऱ्यांना जात – पात अथवा हुद्दा न पाहता शिक्षा केली जात असे.

व्याख्याते मा. अरविंद जगताप यांनी आपल्या भाषणात म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ महाराष्ट्रात अथवा भारतात नव्हे तर शंभरहून अधिक देशांमध्ये (Pimpri News) जयंती साजरी करण्यात येते. छत्रपती हे रयतेचे राजे होते. त्यामुळे बलाढ्य शत्रूंना देखील त्यांच्या मृत्यूनंतर साम्रज्य संपवता आले नाही.

Chinchwad Bye-Election :  भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा बुधवारी रोड-शो

या कार्यक्रमात शिव , शाहू, फुले, आंबडेकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विचार घेऊन समाजात उत्कृष्ट पणे काम करणारे दादाभाऊ आल्हाट यांना मराठा सेवा संघाच्या शहर अध्यक्ष अँड लक्ष्मण रानवडे यांच्या हस्ते ‘कार्यकर्ता पुरस्कार ‘ देण्यात आला.

यावेळी उद्योग कक्षाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे मनोज गायकवाड यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना अँड रानवडे म्हणाले की, (Pimpri News) जगामध्ये सर्वप्रथम व्हिएतनाम या देशाने महाराजांच्या गनिमी काव्याच्या तंत्राने अमेरिकेसारख्या महा बलाढ्य शक्तीला झुकविण्याची कामगिरी केली असे त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रांजळ कबुली दिली होती .

कार्यक्रमाचे संयोजन पंचशील संघाचे आर. जी. गायकवाड , मांगल्य संघाचे सेवा संस्थेचे अध्यक्ष राजू आवळे , अण्णाभाऊ साठे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर अण्णा कांबळे , मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष वाल्मिकी माने, उपाध्यक्ष प्रकाश बाबर , सचिव सचिन दाभाडे , जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्षा माणिक शिंदे, सचिव प्रियांका पाटील, संत गाडगे बाबा प्रबोधन कक्षाचे अध्यक्षा शोभा जगताप यांनी केले . प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेड संघटनेचे जिल्हा अध्यक्षा सुनीता शिंदे यांनी केले. तारा सूत्र संचालन संत तुकोबा साहित्य परिषदेचे अध्यक्ष गोविंद खामकर यांनी केले , तर सुरेश इंगळे यांनी सर्वांचे आभार मानले .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.