Pune Crime : मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज पुण्यातील बाणेर रोड येथे सुरु असलेल्या मेट्रोच्या बांधकाम साईटवरून लोखंडी साहित्य चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे (Pune Crime) तर दोन जण पसार झाले आहेत. हि घटना सोमवारी (दि.20) पहाटे घडली.

याप्रकऱणी दिनेश प्रधान (वय 22 रा. पाषाण) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिपक पांडुरंग इदवे (वय 28 रा. पिंपरी) व एक महिला (वय 37 रा.थेरगाव) यांना अटक केली असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.

Pimpri News : मानवतावाद हा शिवरायांच्या व्यक्तिमत्वामधील विशेष गुण – विजय गायकवाड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रोडवर मेट्रो ट्रॅकचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे तेथे बांधकामाचे साहित्य पडलेले आहे. फिर्यादी हे तेथे सुरक्षारक्षक म्हणून मागील सहा महिन्यापासून काम करत आहेत. फिर्यादी कर्तव्यावर असताना आरोपी त्यांच्या रिक्षामधून आले त्यांनी मेट्रोच्या बांधकामाचे सुमारे 200 किलो वजनाचे लोखंडी साहित्य यात लेजर पाईप, यु हेड नग अशा एकूण 25 हजार रुपयांचा एवज चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी फिर्यादींनी दोन आरोपींना पकडले मात्र दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस इतर आरोपींच्या शोधात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.