Chinchwad : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – पेरणे फाटा येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादनासाठी (Chinchwad) लाखो अनुयायी येत असतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतुकीत बदल केले जात आहेत. पुणे-नगर रोडवर हा कार्यक्रम असल्याने नगर बाजूकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने देखील हद्दीतील वाहतुकीत बदल केले आहेत.

चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजुकडील जाणा-या व येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. (अनुयायी यांच्या वाहनांखेरीज)

सोलापूर रोडवरुन आळंदी चाकण या भागात येणारी जड वाहने माल वाहतुक (टेम्पो /ट्रक) ही वाहने हडपसर-मगरपट्टा-खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदीकडे तसेच देहू फाटा चौकात डावीकडे वळून पुढे पुणे नाशिक रोडवरुन चाकण येथे जातील.

मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने/माल वाहतूक (टेम्पो/ट्रक) ही वाहने वडगाव मावळ-एचपी चौक म्हाळुंगे वासोली फाटा- बिरदवडी गाव रोहकल फाटा-पुणे नाशिक रोड- खेड- मंचर- नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगर येथे जातील.

मुंबई येथुन अहमदनगरकडे जाणारी जड वाहने/माल वाहतूक (टेम्पो/ट्रक) ही वाहने वडगाव मावळ – एचपी चौक म्हाळुंगे- वाघजाईनगर- बिरदवडी गाव- रोहकल फाटा- पुणे नाशिक रोड- खेड- मंचर- नारायणगाव-आळेफाटा मार्गे अहमदनगर येथे जातील.

मुंबई येथून  अहमदनगर बाजुकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार, जिप इ. वडगाव मावळ- चाकण चौक खेड- पाबळ शिरुर मार्गे अहमदनगर येथे जातील.

Pune : 31 डिसेंबरच्या निमित्ताने राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे सिंहगड पायथा येथे गड पावित्र्य मोहिम

आळंदी- शेल पिंपळगाव बहुळ- साबळेवाडी दोन्ही बाजुकडील जाणारी येणारी सार्वजनिक/खाजगी प्रवासी वाहतूक पूर्ण पणे बंदी करण्यात येत आहे. (अनुयायी यांच्या वाहनांखेरीज)

आळंदी -मरकळ लोणीकंदकडे जाणारी व येणारी सार्वजनिक/खाजगी प्रवासी वाहतूक पूर्ण पणे बंदी करण्यात येत आहे. (मरकळ गाव, इंद्रायणी नदी पुलावर 9 फुट उंचीवर लोखंडी ओव्हरहेड बॅरिकेट लावले असल्याने त्यापेक्षा जास्त उंचीची वाहने येथून जाऊ शकणार नाहीत. त्यापेक्षा कमी उंचीच्या फक्त अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)

मुंबईकडून देहूरोड येथे जुन्या पुणे मुंबई हायवेने येणारी वाहतूक सेंट्रल चौकातून निगडी पिंपरी चिंचवडकडे न जाता सदरची वाहतूक ही सेंट्रल चौकाकडून मुंबई बेंगलोर हायवेने सरळ वाकडनाका- चांदणी चौकातून इच्छित स्थळी जावु शकतील. (अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)

मुंबई कडून एक्सप्रेस हायवेने पुणेकडे जाणारी वाहने उर्से टोलनाका येथून मुंबई बेंगलोर हायवेने (निगडी मुकाई चौकाकडे न जाता) सरळ वाकड नाका व राधा चौक येथून पुणेकडे जाऊ (Chinchwad) शकतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.