Maval : तहसीलदारांनी रेशन कार्ड देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी – रामदास काकडे

काँग्रेस कमिटी तर्फे तालुकास्तरीय महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज – तहसीलदारांनी मावळ तालुक्यातील नागरिकांना रेशन कार्ड (Maval) देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभा करावी, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी व्यक्त केले. मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा फुले जन आरोग्य योजना मावळ तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात रुजवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे. मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वडगाव मावळ येथील बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली.

 

महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच पिवळे रेशन कार्ड धारक तसेच दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारक, या योजनेसाठी पात्र असून मावळ तालुक्यात पवना हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल, मायमर जनरल हॉस्पिटल, ढाकणे हॉस्पिटल,संजीवनी हॉस्पिटल लोणावळा ह्या सक्रिय हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून मावळ तालुक्यातील रुग्णांना प्रभावीपणे योजनेचा लाभ घेता यावा यासाठी मावळ तालुका काँग्रेस कमिटी प्रयत्न करणारा असून तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन या योजनेविषयी आरोग्य सेवक माहिती देणार आहेत. सुमारे दीड लाख रुपये कॅशलेस स्वरूपात रुग्ण वरील हॉस्पिटलमध्ये वापरू शकतात. त्यासाठी योजने नुसार विविध पात्र आजारांची यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे.

Chinchwad : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीत बदल

 

एन्जोप्लास्टी व किडनी संबंधित विविध आजार देखील या योजनेत मोफत देण्यात येत असून शासनामार्फत देण्यात येणाऱ्या योजनेचा सर्व स्तरीय पात्र रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी केले आहे.

प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन आरोग्य सेवक, ग्रामसेवकांच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देऊन पात्र रुग्णांसाठी वरील पाच पैकी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये त्वरित उपचारांसाठी तत्पर असणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी दिली आहे.

आरोग्य मित्रांच्या मदतीने वरील हॉस्पिटल मध्ये प्रभावी सेवा मिळावी यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आले असून लवकरात लवकर महात्मा फुले योजनेचे कार्ड वितरित करण्याचा कार्यक्रम काँग्रेस कमिटी तर्फे राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी दिली (Maval) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.