Pune : 31 डिसेंबरच्या निमित्ताने राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे सिंहगड पायथा येथे गड पावित्र्य मोहिम

एमपीसी न्यूज – आज 31 डिसेंबरच्या निमित्ताने राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे सिंहगड (Pune) पायथा येथे गड पावित्र्य मोहिम राबविण्यात आली आहे. प्रतिष्ठानतर्फे वनविभागाच्या तपासणी नाक्यावर विशेष पहारा ठेवला असुन सिंहगडावर जाणाऱ्या वाहनांची कार्यकर्ते कसून तपासणी करत आहेत.

Pimpri : 1 जानेवारीपासून मालमत्ता आकारणी रजिस्टर ऑनलाईन

पर्यटकांकडून देशी- विदेशी दारु, सिगारेट, तंबाखू, गुटखा जप्त करण्यात येत आहे. राजे प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते आज सकाळपासूनच गडावर जाणाऱ्या मार्गावर पहारा देत आहेत. सिंहगडावर 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी दारू पार्ट्या होऊ नये यासाठी ही मोहीम राबवण्यात आली (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.