Chinchwad : महापालिका हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज पिंपरी न्यायालयात वर्ग करा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत (Chinchwad) दहा पोलीस ठाण्यांचा भाग येतो. मात्र त्यातील पाच पोलीस ठाण्याचे कामकाज पिंपरी न्यायालयात होत नाही. ते कामकाज लोकहिताच्या दृष्टीने पिंपरी न्यायालयात वर्ग करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड अॅड. बार असोसिएशनने केली आहे. याबाबत असोसिएशनकडून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, माजी सचिव ॲड. गोरख कुंभार, माजी उपाध्यक्ष ॲड. प्रतीक जगताप, सहाय्यक सरकारी अभियोक्ता साधना बोरकर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले. त्यात 18 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्यातील पिंपरी, चिंचवड, निगडी, चिखली, भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी, सांगवी, वाकड, हिंजवडी (काही भाग) या 10 पोलीस ठाण्यांचा भाग पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत येतो. त्यापैकी पिंपरी, चिंचवड, निगडी, चिखली, एमआयडीसी भोसरी आणि भोसरी पोलीस ठाण्याचा काही भाग पिंपरी न्यायालयाच्या अखत्यारीत आहे.

हिंजवडी आणि रावेत पोलीस ठाण्याचा काही भागाचे कामकाज पुणे येथील न्यायालयात चालते. दिघी (Chinchwad) आणि भोसरी पोलीस ठाण्यातील दापोडी परिसराचे खडकी न्यायालयात तर रावेतच्या काही भागाचे कामकाज वडगाव मावळ न्यायालयात चालते.

Pune News : ‘भारत गौरव रत्नश्री’ पुरस्काराने उद्योजक महेश शेंडगे यांचा सन्मान

पिंपरी न्यायालयाचे मोरवाडी येथून नेहरूनगर येथील प्रशस्त इमारतीमध्ये नुकतेच स्थलांतर झाले आहे. या इमारतीमध्ये 11 न्यायालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हिंजवडी, रावेत, भोसरी मधील दापोडी परिसर, दिघी पोलीस ठाण्यांचे कामकाज नेहरूनगर येथील न्यायालयातून करण्यास जागा उपलब्ध आहे. सध्या पिंपरी न्यायालयात पाच कोर्ट सुरु असून आणखी सहा कोर्ट मंजुरीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे वरील पोलीस ठाण्यांमधील संपूर्ण कामकाज पिंपरी येथील न्यायालयात वर्ग केल्यास पक्षकारांचा वेळ आणि पैसा यांची बचत होईल. त्यामुळे हे कामकाज नेहरूनगर न्यायालयात वर्ग करण्याची मागणी बार असोसिएशनने केली आहे.

बार असोसिएशनने केलेल्या मागणीबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.