Alandi : एमआयटी महाविद्यालयाला कॉम्प्युटर सायन्स व डेटा सायन्स अभ्यासक्रमाला राज्य शासनाकडून मान्यता

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) एम.आय.टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे बी. एस्सी (इन्फोर्मेशन टेकनॉलॉजी), एम. एस्सी (कॉम्प्यूटर सायन्स व डेटा सायन्स) या दोन नवीन अभ्यासक्रमाला राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

महाविद्यालय एम.एस्सी (इंडस्ट्रियल मॅथेमॅटिकस् व कॉम्प्यूटर ॲप्लिकेशनसह बी.एसी संगणकशास्त्र, बी. एससी ॲनिमेशन, बी.एसी (सायबर व डेटा सायन्स), बीसीए सायन्स, बीबीए , बीबीए (इंटरनॅशनल बिजनेस), बीसीए कॉम्प्यूटर ॲप्लिकेशन, वाणिज्य व जनसंवाद पत्रकारिता या स्वरूपाचे अनेक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात.

महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. महाविद्यालयात स्वतंत्र प्लेसमेंट डिपार्टमेंट आहे. या मार्फत मागील तीन वर्षात 1500 विद्यार्थांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकासासाठी सांस्कृतिक विभाग, शाररिक शिक्षण विभाग आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे.

विद्यार्थांना सखोल अभ्यास करण्यास आणि (Alandi) विविध क्षेत्रांमध्ये व्यावहारिक अनुप्रयोग असलेले नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास सक्षम करणे व समाज आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देणे हा महाविद्यालयाचा प्रमुख उद्देश आहे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी व्यक्त केले. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

Chinchwad : महापालिका हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज पिंपरी न्यायालयात वर्ग करा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.