Chinchwad Crime News : ‘या’ कारणामुळे एकाच्या गुप्तांगावर घातली लाथ

एमपीसी न्यूज – ‘गॅरेज समोर दारु पिऊ नका’, असे सांगितले म्हणून एकाच्या गुप्तांगावर लाथ घालून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. धिरज ट्रक बॉडी बिल्डर गॅरेज समोर, रामनगर, चिंचवड याठिकाणी सोमवारी (दि.24) हा प्रकार घडला.

याप्रकरणी चुन्नुलाल सुखारी (वय 52, रा. शाहुनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लाला अशोक शिंदे (रामनगर, चिंचवड), बाळू अशोक शिंदे (रामनगर, चिंचवड) व त्यांच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींना गॅरेज समोर दारु पिऊ नका असे सांगितले. याचा राग आलेल्या आरोपी लाला अशोक शिंदे याने फिर्यादी यांच्या गुप्तांगावर लाथ घातली. तसेच इतर आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.