Pimpri Corona Update : शहरात आज 623 नवीन रुग्णांची नोंद, 882 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 623 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 882 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 25 आणि महापालिका हद्दीबाहेरील 13 अशा 38 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 967 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 48 हजार 345 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 5 हजार 650 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 2 हजार 113 रुग्ण गृहविलगीकरणात असून 3 हजार 537 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 184 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 369 आहेत. आज दिवसभरात 4 हजार 105 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 4 लाख 84 हजार 432 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.