Chinchwad : घंटागाडी कर्मचाऱ्याने गाडीभर निर्माल्यातून शोधले मंगळसूत्र

एमपीसी न्यूज – गौरी विसर्जनाच्यावेळी देवीसमोर ठेवलेले मंगळसूत्र (Chinchwad ) निर्माल्यासोबत गेले. दुसऱ्यादिवशी सकाळी ही घटना लक्षात आली. मात्र घंटागाडी कर्मचाऱ्याने निर्माल्याच्या कंटेनरमध्ये अडीच तास शोध घेऊन ते मंगळसूत्र परत मिळवून दिले. कर्मचाऱ्याने केलेल्या या प्रामाणिक कष्टाचे कौतुक होत आहे.

शनिवारी गौरी विसर्जनाच्या वेळी रंजना नंदकुमार नादीवकर यांच्याकडून गौरींच्या गळ्यात घातलेले सोन्याचे मंगळसूत्र निर्माल्यासोबत गेले. रविवारी हा प्रकार उघडकीस आला. रंजना यांनी निर्माल्य दान केलेल्या ठिकाणी केशवनगर घाटावर धाव घेतली.

Pimpri : रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी लोकांनी केली गर्दी

त्या मंगळसूत्र शोधासाठी सकाळी साडेसात वाजता घाटावर गेल्या. तिथे (Chinchwad ) असलेल्या घंटागाडी कर्मचारी सोपान लोंढे यांना हा प्रकार त्यांनी सांगितला. लोंढे यांनी प्रामाणिकपणे तब्बल अडीच तास निर्माल्याच्या कंटेनरमध्ये शोध घेत रंजना यांना त्यांचे आठ ग्रॅमचे सुमारे 35 हजारांचे मंगळसूत्र मिळवून दिले. त्यांच्या या कामाबाबत माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे यांनी सोपान लोंढे यांचे कौतुक केले.

दहा वर्षांपूर्वी चिंचवडमधील एका महिलेचे साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र लक्ष्मीपुजनाच्यावेळी कचऱ्यात गेले होते. मात्र त्यावेळी देखील सोपान लोंढे यांनी त्या महिलेला त्यांचे मंगळसूत्र परत मिळवून दिले. तसेच गेली अनेक वर्ष आपण घंटागाडी कर्मचारी म्हणून काम करीत आहोत. न्यायालयाने आदेश देऊनही आपल्याला कायम सेवेत घेतले नसल्याची खंत लोंढे यांनी व्यक्‍त (Chinchwad ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.