Pimpri : रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी लोकांनी केली गर्दी

पावसानेही मारली दांडी

एमपीसी न्यूज – गेली तीन-चार दिवसापासून सलग पडणाऱ्या पावसामुळे (Pimpri) लोकांनी गणेशोत्सवातील देखावे पाहण्याऐवजी घरात राहणे पसंत केले होते. मात्र  रविवारी सुट्टीच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे दिसले. तथापि, काल दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसते.

शहरात अनेक गणेश मंडळांनी आकर्षक, चित्त थरारक देखावे उभारले आहेत. लोकांना आकर्षित करण्यासाठी नेत्रदीपक रोषणाई, मनमोहक सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी देशातील प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती उभारण्यात आले आहेत.

 

तसेच लहान मुलांसाठी बाल जत्रेचे आयोजन देखील करण्यात आले होते. आकाशी पाळणा, ड्रॅगन ट्रेन, जम्पिंग पॅड, एअर बलून अशा विविध खेळण्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत .

 

आकर्षक देखाव्या सह नाटके,लहान मुलांचे डान्स, संगीत खुर्ची, खेळ पैठणीचा, धार्मिक, सामाजिक अणि प्रबोधनात्मक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनही गणेश मंडळांनी ठीकठिकाणी केल्याचे दिसले. याठिकाणी (Pimpri)  लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे आढळून आले.

 

लहान मुले तरुण-तरुणी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक ही मोठ्या संख्येने गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडल्याचे ठिकठिकाणी दिसले.

 

सलग पाऊस पडत असल्यामुळे आणि कामकाजाचे दिवस असल्यामुळे  लोकांनी घरात राहण्याला पसंती दिली होती. काल मात्र सर्वत्र गर्दी पाहायला मिळाली. यावेळी शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्याने सर्व काही (Pimpri) सुरळीत होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.