Chinchwad : घराघरात गौरींचे आनंदात आगमन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरी आज (गुरुवारी, दि. 21) दुपारी गौरींचे आगमन झाले. महिलांनी (Chinchwad) उत्साहात परंपरा राखत गौरींचे स्वागत केले. तीन दिवसांच्या या सणासाठी महिलांची मागील अनेक दिवसांपासून लगबग सुरु असते. गौरीच्या सणात महिला घरात खूप मोठा आरास करतात. विविध खाद्यपदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो.

गौरी आवाहनाच्या पहिल्या दिवशी अंगणातील तुळशीपासून घरात गौरायांचे आगमन होते. गौरींची पूजा केली जाते. गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फुलोरा आणि फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. सर्वांना धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्य मिळो अशी प्रार्थना आगमनानंतर गौरीकडे करतात.

Nigdi : श्री सिद्धीविनायक सेवा मंदीरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण

अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी, धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्याची प्रार्थना करण्यासाठी(Chinchwad) स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.

पहिला दिवस गौरी आवाहनाचा असतो. माहेरवाशिणींना हा मान दिला जातो. आपापल्या पद्धती आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात. हातात गौरी घेऊन आलेल्या महिलेचे पाय दुधाने व पाण्याने धुवून आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जातात. आत येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणले जातात.

गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत(Chinchwad) केले. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवल्या जातात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना केली जाते. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते. या दिवशी गौरी पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तर तिस-या दिवशी गौरी विसर्जन केले जाते.


आनंद, उत्साहात अन परंपरा राखत गौरींचे आगमन साजरे केले. तीन दिवसांच्या या सणासाठी महिलांची मागील अनेक दिवसांपासून लगबग सुरु असते. गौरीच्या सणात महिला घरात खूप मोठा आरास करतात. विविध खाद्यपदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो.

गौरी आवाहनाच्या पहिल्या दिवशी अंगणातील तुळशीपासून घरात गौरायांचे आगमन होते. गौरींची पूजा केली जाते. गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फुलोरा आणि फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. सर्वांना धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्य मिळो अशी प्रार्थना आगमनानंतर गौरीकडे करतात.

अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी, धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्याची प्रार्थना करण्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.

पहिला दिवस गौरी आवाहनाचा असतो. माहेरवाशिणींना हा मान दिला जातो. आपापल्या पद्धती आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात. हातात गौरी घेऊन आलेल्या महिलेचे पाय दुधाने व पाण्याने धुवून आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जातात. आत येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणले जातात.

गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत केले. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवल्या जातात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना केली जाते. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते. या दिवशी गौरी पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तर तिस-या दिवशी गौरी विसर्जन केले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.