Talegaon : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव शहरात पोलिसांचे पथसंचलन

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर (Talegaon) तळेगाव दाभाडे पोलिसांनी शहरात पथसंचलन केले. गणेशोत्सव उत्साह आणि आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हे पथसंचलन करण्यात आले.

सध्या गणेशोत्सव आनंदी वातावरणात सुरु आहे. गणेशोत्सव मंडळांकडून आकर्षक सजावटी आणि देखावे करण्यात आले आहेत. देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. रात्रीच्या वेळी शहरात मोठी गर्दी होते. या गर्दीत चोरी तसेच महिला छेडछाडीचे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी काळजी घेतली आहे.

Maval : नदी ओलांडताना एकजण गेला वाहून

खाकीचा धाक दाखवण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यासाठी पथसंचालन केले गेले. यामध्ये तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, अधिकारी आणि (Talegaon) कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी देखील सहभागी झाली. अनुचित प्रकार घडल्याचे निदर्शनास येताच तत्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.