Mahavitaran : वीज कंत्राटी कामगारांना 20 हजार रुपये पगारवाढ द्या; महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यातील महावितरण (Mahavitaran), महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षापासून काम करीत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे. अथवा समान काम समान वेतन किंवा कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धतीने वयाच्या 60 वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी देण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. 

याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंत या कामगारांना सध्या मिळणा-या पगारात 20,000 रुपये प्रतिमाहे पगारवाढ करावी. कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधने, मेडिक्लेम, प्रशिक्षण, गणवेश, रेनकोट, बूट, गणवेश धुलाई भत्ता, मोबाईल व पेट्रोल भत्ता, ओव्हर टाईम, जादा सुट्या मिळाव्या, अशा अनेक कामगार हिताच्या व पगारवाढीबाबत मागण्यांचा प्रस्ताव वीज कंपनीला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यां पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला.

Talegaon : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव शहरात पोलिसांचे पथसंचलन

यावेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष निलेश खरात, कार्याध्यक्ष अमर लोहार, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटनमंत्री ऊमेश आणेराव, उप सरचिणीस राहूल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, निवासी सचिव सुनील कांबळे, सविता येळवे, गीता रणधीर, पल्लवी सुखदेव आदी उपस्थित होते. महावितरण कंपनीचे अध्यक्ष लोकेश चंद्र, महानिर्मीती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनबलगन, महापारेपण कंपनीचे मानव संसाधन विभागाचे सुमीत गमरे, महावितरणचे संचालक विक्त मा दिघे, मानव संचालक अरविंद भादीकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी मागणी पत्र स्विकारले.

मागील करारावेळी मुळ वेतनात केवळ 20% पगारवाढ मिळाली (Mahavitaran) होती. आता 1 एप्रिल 2023 पासून 2028 पर्यत नवा करार होईल. मा.ऊर्जामंत्री व वीज कंपनी प्रशासन यांच्याद्वारे यावेळी देखील सहानुभूती पूर्वक आमच्या मागण्याचा विचार होईल, असा विश्वास महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाने व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.