Pune News : कंत्राटी कामगारांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार- महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

एमपीसी न्यूज – वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण (Pune News) योगदान कंपनी,  समाजाला  राहीले आहे.  कायम कामगारांच्या समवेत कंपनी मध्ये गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने व नियमीतपणे कार्यरत आहेत.  या कामगारांचे  विविध प्रश्न,  मागण्या सरकार कडे,  प्रशासन पातळीवर प्रलंबित आहेत.  या बाबतीत सरकारने सकारात्मक भूमिका घेवून कामगारांना न्याय द्यावा. हा न्याय मिळेपर्यंत संघर्ष करू अशी भूमिका (Pune News )महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ( संलग्न भारतीय मजदूर संघ) चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी राजगुरुनगर येथे आयोजीत कामगार मेळाव्यात स्पष्ट केली.

या वेळी मंचावर भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण,  महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे उपमहामंत्री राहूल बोडके,  शरद संत,  पुणे जिल्हा सुमीत कांबळे,  प्रवीण पवार, मार्गदीप मस्के  पुर्व अध्यक्ष शरद संत उपस्थित होते , महावितरण पुणे विभाग उपमुख्य संबंध अधिकारी शिरीश काटकर उपस्थित होते.

कंत्राटी कामगारांच्या रोजगारात स्थैर्य,  कंत्राटदार मुक्त रोजगार पध्दत,  वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना स्वंतत्र वेतन श्रेणी,  समान काम समान वेतन,  ई ऐस आय चे सुसज्ज आरोग्या साठी हॉस्पीटल,  खेड ,जुन्नर  तालुक्यातील कामगारांना करिता ई ऐस आय चे हॉस्पीटल ची योजना,  ई महत्वपूर्ण बाबी शासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. लेबर ऑफीस, कोर्टाच्या माध्यमातून कामगारांना निश्चितच रोजगारात संरक्षण मिळाले आहे ,पण कंत्राटी कामगारांच्या विविध धोरणात्मक निर्णय करिता  शासनाने महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या सोबत  बैठक आयोजित करावी अशी मागणी संघटनेचे पदाधिकारी अर्जुन चव्हाण,  राहूल बोडके , शरद संत  यांनी मार्गदर्शन करताना केले आहे.

 

Talegaon Dabhade : बंद ही तर जनतेचीच मागणी- सुनील मोरे

 

4 मार्च जागतीक लाईनमन दिवस साजरा केला जातो,  काम करताना सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,  असे प्रतिपादन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीश काटकर यांनी केले आहे. या वेळी सुरक्षा कार्यप्रणाली नुसार काम करावे. असे प्रतिपादन केले आहे. या वेळी सुरक्षा शपथ घेतली. मेळाव्या  मध्ये मार्गदर्शन शरद संत, सुमीत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले आहे. मेळावा पुर्वी महावितरण कंपनी कार्यकारी अभियंता कार्यालय समोर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांच्या वार्ता फलकाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,संघटनेचे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी केले व आभार मंगेश कोहिणकर यांनी केले

कार्यक्रमाचे नियोजन,  यशस्वी करण्यासाठी  महत्वपूर्ण योगदान मंचर (Pune News) विभागातील केतन गोरडे, अमोल पोकळे, गणेश वाळुंज, अमोल वाबळे ,दीपक सातकर, अमोल सुपे , शुभम आल्हाट, हनुमंत गावडे ,तुकाराम काळे ,श्रीकांत होजगे, अमोल सुपे, किरण शेवाळे, अंकुश दळवी, मंगेश कोहिनकर,बापू गावडे, सार्थक सांडभोर सुरज तांबे, निलेश निकम ,निखिल मांजरे, किरण बुट्टे या कार्यकर्तेनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.