Pune News : सिहंगड रस्त्यावर फर्निचर गोडाउनला भीषण आग;  सुदैवाने जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – पुण्यातील  सिंहगडरोडवरील साईनाथ फर्निचर (Pune News) गोडाउनला बुधवारी (दि.8) मध्यरात्री एक वाजता भीषण आग लागली.यामध्ये सर्व फर्निचर जळून खाक झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

याप्रकरणी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात साईनाथ फर्निचर गोडाउन, विठ्ठलवाडी, सिहंगड रस्त्यावर सदर गोडाउनला मोठी आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून सिहंगड, नवले, जनता, कोथरुड, एरंडवणा व मुख्यालयातून एक टँकर रवाना करण्यात आले होते.

Pune News : कंत्राटी कामगारांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार- महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

 

या आगीमधे गोडाउन मधील फर्निचर साहित्य, टेबल, खुर्ची, इलेक्ट्रीक वायरिंग, मशीन व इतर लाकडी सामान जळाले असून आगीमुळे छताचा काही भाग कोसळला आहे. गोडाउनचे क्षेञफळ 1 हजार 500 चौ.फुट क्षेत्र बाधीत झाले आहे.

घटनास्थळी आगीचे रौद्र रुप पाहताच जवानांनी चहुबाजूने पाण्याचा मारा सुरू करत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मुख्य दरवाजाला कुलूप असल्याने अग्निशमन उपकरण बोल्ड कटरच्या साह्याने तोडून आतमधे प्रवेश करुन तसेच गोडाऊनच्या छतावर जाऊन पाण्याचा मारा सुरू ठेवला व सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणली. जवानांनी वेळीच  आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूला असणाऱ्या इतर दुकानांचे नुकसान(Pune News) झाले नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.