Maval : नदी ओलांडताना एकजण गेला वाहून

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील आढे (Maval) येथे नदी ओलांडत असताना एक व्यक्ती नदीच्या प्रवाहात वाहून गेला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी दोन दिवस शोध मोहीम राबवत तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

गजानन राजाराम बोरकर (वय 39, सध्या रा. पिंपळ खुटे मावळ. मुळ गाव बुलढाणा) हे आढे येथे नदी ओलांडून जात असताना पाण्यात वाहून गेले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा, आपदा मित्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी आढे येथे धाव घेतली. बुधवारी (दि. 20) दिवसभर शोध घेतला मात्र वाहून गेलेला व्यक्ती सापडला नाही. दुसऱ्या दिवशी देखील त्याचा शोध घ्यावा, अशी विनंती नातेवाईकांनी केली. त्यानुसार गुरुवारी (दि. 21) देखील सकाळपासून शोधकार्य पुन्हा सुरु केले.

Thergaon : दुकानासमोरील बोर्ड काढण्यास सांगितल्याने दुकानदाराला मारहाण

पथकाने दूरपर्यंत शोध घेतला. गुरुवारी दुपारी चार ते पाच (Maval) किलोमीटर अंतरापर्यंत शोध घेतल्यानंतर बेबडओव्हाळ गावच्या हद्दीत नदीत टाकलेल्या पाण्याच्या मोटरच्या दोरीला मृतदेह अडकला होता.

निलेश गराडे, अनिल आंद्रे, दक्ष काटकर, विनय सावंत, गणेश गायकवाड, शत्रुघ्न रासणकर, रमेश कुंभार, संतोष दहिभाते, शुभम काकडे यांनी मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.