Thergaon : दुकानासमोरील बोर्ड काढण्यास सांगितल्याने दुकानदाराला मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानासमोर लावलेल्या बोर्डमुळे दुकान (Thergaon) झाकले जात असल्याने बोर्ड काढण्यास सांगण्यासाठी गेलेल्या दुकानदाराला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी दीड वाजताच्या सुमारास साई राम इलेक्ट्रोनिक्स समोर, थेरगाव येथे घडली.

संतोष बबनराव मदने (वय 47, रा. रहाटणी) असे जखमी दुकानदाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Thergaon) फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास राघू वायाळ (वय 61, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Moshi : भरधाव कारच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या साई राम इलेक्ट्रोनिक्स या दुकानाचे मालक विलास वायाळ यांनी दुकानाच्या बाहेर लोखंडी ग्रील करून त्यावर बोर्ड लावला.

त्या बोर्डमुळे फिर्यादी यांचे दुकान झाकले जात होते. त्यामुळे फिर्यादी हे आरोपीकडे बोर्ड काढण्यास सांगायला गेले. त्यावेळी आरोपीने लोखंडी अॅंगलने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.