Chinchwad : नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनियर कॉलेजच्या खो-खो संघाने मारली बाजी

एमपीसी न्यूज – जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका ( Chinchwad) यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील कै. सदाशिव बहिरवाडे क्रीडांगण येथे जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनियर कॉलेजचा संघ विजयी ठरला.

वार्षिक शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे दि. 6 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध वयोगटातील मुलामुलींच्या खो खो स्पर्धा पार पडल्या. या खो-खो स्पर्धेतील 19 वर्षाखालील मुलींच्या गटात चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनियर कॉलेजच्या संघाने विजेतेपद मिळवला आहे.

विजयी संघाकडून कु.प्रगती मुडपे व कु.नम्रता बडीगेर यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत सामना एकतर्फी खेचून आणला. अंतिम सामन्यामध्ये नॉव्हेल च्या संघाने राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचा 11-2 असा पराभव केला. त्यामुळे नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनिअर कॉलेजचा संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

Chinchwad : संकटांचा सामना करावाच लागेल – पंडित प्रदीप मिश्रा

विजयी संघाचे नॉव्हेल ग्रुप ऑफ इंस्टियूटचे अध्यक्ष अमित गोरखे, विश्वस्त विलास जेऊरकर ( Chinchwad)  तसेच विद्यालयाच्या प्राचार्या प्रा. मृदुला गायकवाड यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. विजयी संघाला क्रीडा शिक्षक महेश नलवडे आणि प्रितम क्षिरसागर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.