Chinchwad : एक दिवस शाळेसाठी उपक्रमांतर्गत 5200 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – प्रत्येक गुरुवारी 20 शाळांमध्ये जाऊन(Chinchwad) तिथल्या विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मार्गदर्शन केले जात आहे. गुरुवारी (दि. 28) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 20 शाळांमध्ये जाऊन 5 हजार 200 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी आपापल्या विभागात (Chinchwad)प्रत्येक गुरुवारी एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबवतात. या उपक्रमांतर्गत वाहतूक शाखेच्या एकूण 20 टीमच्या माध्यमातून दर गुरुवारी 20 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमन, अपघात विषयी माहिती, व्यसनापासून दूर राहणे, सायबर गुन्हेगारी, सोशल मिडीयाचा वापर आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाते.

Bhima Koregaon PMPML Bus : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पीएमपीकडून ज्यादा बसेसचे नियोजन

मागील चार आठवड्यांपासून हा उपक्रम सुरु आहे. आजवर 25 हजार 291 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जबाबदार आणि चांगला नागरिक बनविण्याच्या हेतूने वाहतूक शाखेकडून प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित एक्झाम वॉरीयर्स पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.