Chinchwad : विद्याताई देव यांचे निधन

एमपीसी न्यूज – चिंचवड देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त विघ्नहरी देव महाराज (Chinchwad)यांच्या पत्नी विद्याताई देव यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवारी, दि. 29) निधन झाले.

चिंचवड गावात अनेक महिलांना विविध संस्कृत स्तोत्र व गीता यांची (Chinchwad)संथा विद्याताई यांनी दिली होती. संस्कृत परीक्षांचा अभ्यास त्या करवून घेत असत. अत्यंत निःस्वार्थीभावाने, सातत्याने तळमळीने व सेवाभावाने त्या हे कार्य करत होत्या. अनेक महिलांना त्यांनी घडविले. महिलांना एक चांगला मार्ग दाखवला.

Bhima Koregaon PMPML Bus : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पीएमपीकडून ज्यादा बसेसचे नियोजन

श्रीविष्णूसहस्रनाम आवर्तनाला मागील वर्षी देव महाराज व विद्याताई उपस्थित होते. सुसंस्कृत समाज घडविण्यात त्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांचे कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.