Bhima Koregaon PMPML Bus : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पीएमपीकडून ज्यादा बसेसचे नियोजन

एमपीसी न्यूज – एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव (पेरणे फाटा) येथे (Bhima Koregaon PMPML Bus )विजयस्तंभ अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलने ज्यादा बसेसचे नियोजन केले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन आणि शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठ ठिकाणावरून या बसेस सोडल्या जाणार आहेत.

पीएमपीएमएल प्रशासनाकडून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी या ज्यादा बसेस चालवल्या जाणार आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून 17 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तिथून पेरणे फाटा येथे जाण्यासाठी पीएमपी बसेस चालवल्या जाणार आहेत. वाहनांची गर्दी टाळण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ही सोय केली आहे.

Pune : शौर्य दिनी पॅक बंद पाण्याची सोय करण्याची मागणी

पीएमपीएमएल प्रशासनाने आठ ठिकाणावरून ज्यादा बसेस(Bhima Koregaon PMPML Bus) चालवण्याचे नियोजन केले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुस्ती मैदान लोणीकंद, खंडोबा माळ लोणीकंद, सैनिकी शाळा फुलगाव तुळापुर रोड आणि चिंचवड हॉटेल वाय जंक्शन तुळापुर रोड येथून शहराच्या विविध भागात ज्यादा बसेस चालवल्या जातील. तर शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीत पार्किंग वक्फ बोर्ड, जाधव पार्किंग चाकण रोड, तोरणा हॉटेल शिक्रापूर पार्किंग, वढू पार्किंग इनामदार हॉस्पिटल येथून ज्यादा बसेस सोडल्या जातील.

विजयस्तंभास अभिवादनासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ –

(पार्किंग ठिकाणापासून विजयस्तंभा पर्यंत पीएमपीएमएल बसेसची सुविधा करण्यात आली आहे.)

पुणे शहराकडून येणा-या वाहनांसाठी पार्किंग –

लोणीकंद आपले घर शेजारील पार्किंग क्र. 1 – दुचाकी पार्किंग

लोणीकंद आपले घर शेजारील पार्किंग क्र. 2 – चारचाकी पार्किंग

लोणीकंद बौद्ध वस्ती शेजारी पार्किंग क्र. 3 – चारचाकी पार्किंग

लोणीकंद आपले घर सोसायटीचे मागील पार्किंग क्र. 4 – खासगी बस व मोठी वाहने

लोणीकंद मोनिका हॉटेल शेजारील पार्किंग क्र. 5 – दुचाकी पार्किंग

हॉटेल ओम साई लॉजच्या पाठीमागील पार्किंग क्र. 6 – चारचाकी पार्किंग

तुळापुर फाटा स्टफ कंपनी शेजारी पार्किंग क्र. 7 – चारचाकी पार्किंग

तुळापुर फाटा राजशाही मिसळ हॉटेल मागे पार्किंग क्र. 8 – दुचाकी पार्किंग

एक जानेवारी रोजी पुणे आणि थेऊरकडून येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची वर्दळ जास्त असल्याने लोणीकंद चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून लोणीकंदकडून खंडोबा माळ आणि सोमेश्वर पार्किंगकडे जाणारा मार्ग एकेरी राहिल (पीएमपीएमएल बस वगळून)

आळंदीकडून येणा-या वाहनांसाठी पार्किंग –

तुळापुर रोड वाय पॉईंट समोरील पार्किंग क्र. 9 – चारचाकी पार्किंग

तुळापुर रोड हॉटेल शेतकरी मिसळ शेजारील पार्किंग क्र. 10 – दुचाकी पार्किंग

तुळापुर रोड हॉटेल रॉयल लॉजचे शेजारी पार्किंग क्र. 11 – दुचाकी पार्किंग

तुळापुर रोड हॉटेल चिंचवन समोर रॉयल लॉजमागे पार्किंग क्र. 12 – चारचाकी पार्किंग

तुळापुर रोड फुलगाव सैनिकी शाळा मैदान पार्किंग क्र. 13 – चारचाकी पार्किंग

थेऊर / सोलापूर कडून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग –

सोमवंशी अॅकॅडमी समोर थेऊर रोड पार्किंग क्र. 14 – चारचाकी पार्किंग

थेऊर रोड, खंडोबाचा माळ वेअर हाऊस शेजारी पार्किंग क्र 15 – चारचाकी पार्किंग

थेऊर रोड खंडोबा माळ पार्किंग क्र. 16 – दुचाकी पार्किंग

अष्टापुर डोंगरगावच्या दिशेने येणा-या वाहनांसाठी पार्किंग –

पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळया समोरील मोकळे मैदान पार्किंग क्र. 17 – दुचाकी/चारचाकी पार्किंग

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.