Pune : शौर्य दिनी पॅक बंद पाण्याची सोय करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – शौर्य दिनी भीमा कोरेगाव येथे (Pune)टँकरने पाणी वाटप करताना गर्दी होते आणि त्यातून नागरिकांची गैरसोय होते.

ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाने पॅक बंद पाण्याची सोय करावी, अशी मागणी संविधान ग्रुपचे सचिन गजरमल, राकेश सोनवणे, राजे प्रतिष्ठानचे मिलिंद गायकवाड, लष्कर-ए-भीमा संघटनेचे सचिन धीवार आणि सहकाऱ्यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे याबाबत निवेदन दिले आहे.

Pimpri : उद्योगनगरीत 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची लगबग सुरू

एक जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव येथे शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र येत असतात. त्यांना पाण्याच्या टँकरने पाणी पुरविण्याएवजी पॅक बंद बॉटलमध्ये पाणी वाटण्याची व स्तंभाजवळ बॅरिकेट काढून सर्वसामान्य नागरिकांना स्तंभापर्यंत पोहोचून अभिवादन करता येईल अशी व्यवस्था करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

मागील तीन वर्षापासून पॅक बंद पाण्याची(Pune) सोय करण्याची मागणी केली जात आहे. भीमा कोरेगाव येथे शौर्य स्तंभाला येणाऱ्या अनुयायांसाठी तिथे टँकरने पाणीपुरवठा करू नये. त्यामुळे गर्दी होऊन गैरसोय होते.

तिथे पॅक बंद बाटल्यांनी पाणीपुरवठा करण्यात यावा .सर्व अधिकाऱ्यांसाठी तिथे पाण्याच्या बाटलीची व्यवस्था केली जाते. पण सर्वसामान्य भिम अनुयायांसाठी टॅंकरने पाणी दिले जाते. हा दुजा भाव आहे. टँकरने सर्वाना पाणी कोणीच देऊ शकत नाही.

ते पाणी वाया जाते आणि सर्वसामान्य भीम अनुयायांना पाणी मिळत नाही. गर्दी असल्यामुळे टँकर आत येऊ शकत नाही. लोक पाण्यासाठी इकडे तिकडे भटकतात. त्यामुळे शासन भीमा कोरेगाव येथे कोट्यावधी रुपये खर्च करत असून देखील त्याचा उपयोग होत नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.