Maval : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – जिल्हा परिषद, पुणे शिक्षण विभाग, (Maval)पंचायत समिती वडगाव मावळ, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ, मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ व डॉ डी वाय पाटील इंजीनियरिंग कॉलेज वराळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 51 व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मावळचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज यांच्या हस्ते करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात सहावी ते बारावीच्या 257 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड, प्राचार्य डॉ सुरेश माळी, प्राचार्य प्रमोद पांडे, तालुकाध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, सचिव विकास तारे, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश सुतार, सचिव चंद्रकांत मुरुमकर समन्वयक संतोष भोसले, प्रदर्शन समन्वयक किरण माळी आदी उपस्थित होते.

Pimpri : उद्योगनगरीत 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची लगबग सुरू

सदर प्रदर्शन हे वराळे येथील डॉ डी वाय पाटील (Maval)इंजीनियरिंग कॉलेज वराळे ता. 27 व 28 रोजी संपन्न होत आहे. प्रकल्प, निबंध, वकृत्वस्पर्धा, प्रश्नमंजुषा आदी गटात हे प्रदर्शन होत असून यामध्ये 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

वेगवेगळ्या गटातून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून एकूण 257 विद्यार्थी व शिक्षक यांचा सहभाग होता प्रकल्पाची व उपक्रमांची मांडणी केली. या प्रदर्शनात अपंग विद्यार्थ्यांसह शिक्षक व प्रयोगशाळा परिचर आदींनी देखील उस्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश सुतार यांनी केले. मुलांना मार्गदर्शन व शुभेच्छा राजेश गायकवाड आणि डॉ. सुरेश माळी यांनी दिल्या. सूत्रसंचालन संतोष भोसले यांनी केले.तर आभार विठ्ठल माळशिकारे यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.