Pune : पुणे पोलीस दलातील 17 खेळाडूंनी नेमबाजी स्पर्धेत जिंकली 20 सुवर्ण, 12 रौप्य आणि 7 कांस्य पदके

सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम यांची जकार्ता येथे होणाऱ्या एशियन शुटींग स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य पोलीस शुटींग (सर्विस वेपन व स्पेटर्स वेपन) (Pune)स्पर्धा 2023 20 ते 26 डिसेंबर या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 आणि शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे पार पडल्या. या स्पर्धेत पुणे शहर पोलीस दलातील 17 नेमबाजांनी भरघोस पदकांची कमाई केली आहे.

या खेळाडूंनी 20 सुवर्ण, 12 रौप्य आणि 7 कांस्य पदके प्राप्त करत पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयास सर्विस वेपन, स्पोर्ट्स पुरुष, स्पोर्ट्स महिला या तिन्ही प्रकारात सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवून दिले.

Pune : शौर्य दिनी पॅक बंद पाण्याची सोय करण्याची मागणी

स्पर्धेत पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (एक सुवर्ण, एक रौप्य), (Pune)सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम (दोन सुवर्ण, एक रौप्य), सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस (एक कांस्य), पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे (एक कांस्य), सहायक पोलीस फौजदार नितीन शिंदे (एक रौप्य, एक कांस्य), सहायक पोलीस फौजदार सुनील पवार (एक रौप्य, एक कांस्य), सहायक पोलीस फौजदार राजेंद्र पाटील (सहा सुवर्ण, एक रौप्य), पोलीस हवालदार अमोल नेवसे (दोन सुवर्ण), पोलीस हवालदार महेश जाधव (एक सुवर्ण, दोन रौप्य, एक कांस्य), पोलीस हवालदार अनिल उपरे (एक रौप्य), पोलीस हवालदार मंगेश खेडकर (एक सुवर्ण), पोलीस हवालदार विजय कांबळे (एक कांस्य), पोलीस हवालदार वैशाली गोडगे (एक सुवर्ण, दोन रौप्य), पोलीस नाईक दत्तात्रय गाडे (एक सुवर्ण, एक रौप्य), पोलीस हवालदार सुहास धायगुडे आणि सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मोरे यांनी पदकांची कमाई केली.

सहायक पोलीस फौजदार राजेंद्र पाटील यांनी सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धेतील पिस्टल शुटर व सर्वोत्कृष्ठ एमपी 5 शुटरच्या किताबासह चषक मिळवले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारे सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम यांची जकार्ता, इंडोनेशिया येथे जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या एशियन शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी 25 मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात भारतीय संघात निवड झाली आहे. विजेत्या खेळाडूंचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी अभिनंदन केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.