Pimpri : उद्योगनगरीत 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची लगबग सुरू

एमपीसी न्यूज – शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन (Pimpri)6 व 7 जानेवारी 2024 रोजी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी -चिंचवड शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

नाट्य संमेलनाचे आयोजक असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची लगबग सुरू झाली असून मोरया गोसावी क्रीडा संकुल वर या तयारीने वेग घेतल्याचे दिसते.

PMRDA : प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 30, 32 येथील पात्र लाभार्थ्याचे ई- रजिस्ट्रेशन सुरु

अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वाटचालीतील हे (Pimpri)शतकी संमेलन असल्याने या संमेलनाला विशेष महत्व आहे. राज्यभरात या नाट्य संमेलनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत, 6 व 7 जानेवारी 2024 रोजी 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन’ चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले आहे.

आठवड्याभरावर येवून ठेपलेल्या या नाट्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाचे काम मोरया गोसावी क्रीडा संकुल वर जोरदार तयारी सुरू आहे. मुख्य सभामंडपांतील काम 50 टक्के पूर्ण झाले असून 1 जानेवारीपर्यंत संमेलन स्थळांवरील संपूर्ण काम पूर्ण होईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

तर मुख्य सभामंडप हा 60 बाय 80 फुट इतके मोठे बांधण्यात आला आहे. तसेच लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी भव्य बालमंच देखील उभारण्यात येत आहे.

दोन दिवस उद्योगनगरीत रंगणाऱ्या या 100 व्या अ . भा. म. नाट्य संमेलनासाठी आयोजक उत्सुक असून, तयारी विषयी बोलताना आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, नाट्य संमेलनाच्या तयारीने आता वेग घेतला आहे.

मुख्य सभामंडप आणि बालमंच या शिवाय पिंपरी – चिंचवड शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह (चिंचवड), निळू फुले नाट्यगृह (सांगवी), गदिमा नाट्यगृह (प्राधिकरण), अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) असे एकानंदरीत सहा ठिकाणी 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रंगभूमीवर गाजलेली व्यवसायिक नाटके, बालनाट्य, उल्लेखनीय एकांकिका, प्रायोगिक नाटके,संगीत रजनी, संगीत नाटक यांसह 64 विविध सांस्कृतिक व नाट्य विषयक कार्यक्रम व नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.