PMRDA : प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 30, 32 येथील पात्र लाभार्थ्याचे ई- रजिस्ट्रेशन सुरु

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA)(पीएमआरडीए) पेठ क्रमांक 30-32 येथील पात्र लाभार्थ्याचे ई- रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पेठ क्र.30-32 येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWSव LIG गटातील सदनिकांची लॉटरी पध्दतीने विक्री करण्यात आलेली आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांनी सदनिकेची पूर्ण रक्कम भरलेली आहे.

त्यांच्या समवेत आर्टीकल ऑफ ॲग्रीमेंट करण्याची(PMRDA) प्रकिया 26 डिसेंबर 2023 रोजीपासून ई-नोंदणी पध्दतीने सुरु करण्यात आली आहे.सद्यस्थितीत42 लाभार्थ्यांनी सदनिकेची पुर्ण रक्कम भरणा केली असून 4 लाभार्थ्यांनी रजिस्ट्रेशनचे सर्व शुल्क अदा करुन appointment निश्वित केली आहे.

Pimpri : काेराेनाला घाबरू नका, काळजी घ्या; महापालिकेचे आवाहन
पेठ क्र.24 जुने प्राधिकरण कार्यालय, टिळक चौक, निगडी येथे ई-नोंदणी प्रकिया पार पडणार आहे. लाभार्थ्यांसाठी नोंदणीच्या प्रकियेबाबतच्या सविस्तर सूचना पोर्टलवर 19 डिसेंबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

लाभार्थ्यांना शेवटच्या हप्त्यापोटी येणारी 10% रक्कम तसेच नोंदणीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे शुल्क अदा करणे अनिवार्य आहे. आवश्यक शुल्क भरणा केल्यानंतर लाभार्थ्यांना ई-रजिस्ट्रेशन Appointment निश्वित करता येणार आहे.

नोंदणीसाठी लाभार्थी (Applicant) व सह -लाभार्थी (Co-Applicant) या दोघांनीही हजर राहून त्यांनी दोघांचेही खालील मुळ पुरावे आणणे बंधनकारक आहे. त्यात आधारकार्ड, पॅनकार्ड , OTP साठी आधारकार्डंला लिंक असणारा मोबाईल हँडसेट राखीव प्रवर्गातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र नोंदणीपूर्वी सादर करणे अनिवार्य आहे.

रजिस्ट्रेशननंतर ताबा देणेची कार्यवाही दिनांक 29 डिसेंबर 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी ई- रजिस्ट्रेशनसाठी Appointment निश्वित करुन घेण्यात यावी असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांचे वतीने करण्यात येत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.