Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगले वार्षिक स्नेहसंमेलन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (Talegaon Dabhade)वार्षिक स्नेहसंमेलन’ उत्साहात पार पडले. यावेळी चिमुकल्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करत उपस्तितांची मने जिंकली.

या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार , माजी मुख्याध्यापिका ज्योती चोळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संस्थापक गणेश भेगडे, अध्यक्ष सुनील भेगडे, सचिव दत्तात्रय नाटक, शालेय समिती अध्यक्ष रामराव जगदाळे, ज्येष्ठ संचालक अशोक भेगडे , मिलिंद पोखरकर, बी.एम. भसे, विलास भेगडे, अरुण भेगडे पाटील , संतोष दाभाडे, खंडूजी टकले, संतोष भेगडे ,मुख्याध्यापिका रंजीता थंपी,उपमुख्याध्यापिका कोमल पेंडसे , शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kharadi : खराडी येथील पीटर इंग्लड शोरूममधून 4 लाखांचे कपडे चोरीला

‘रिश्ते द कलर्स ऑफ लाईफ’ या संकल्पनेवर (Talegaon Dabhade)आधारित विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. रक्ताच्या नात्याबरोबरच मनाची नाती देखील कशी जपायची असतात याचा उत्तम संदेश देण्यात आला.विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनातून आपल्या कला सादर केल्या.तसेच यावेळी रंजीता थंपी यांनी शाळेचा वार्षिक अहवाल वाचन देखील केले.उत्कृष्ट विद्यार्थी म्हणूनसाची मन्वर व कीर्ती नंदवरम यांना सन्मानित करण्यात आले.

याबरोबरच उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका म्हणून यशश्री आलम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गणेश भेगडे, ज्योती चोळकर,विवेक इनामदार यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. तसेच विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.