Kharadi : खराडी येथील पीटर इंग्लड शोरूममधून 4 लाखांचे कपडे चोरीला

एमपीसी न्यूज – खराडी येतील पीटर इंग्लड या नामांकीत(Kharadi ) ब्रँडच्या शोरूममधून चक्का 4 लाख रुपयांचे कपडे चोरीला गेले आहेत. ही चोरी ख्रिसमस च्या पहाटे म्हणजे सोमवारी (दि.25) 3 ते 5 या दोन तासाच्या कालावधीत घडली.

याबाबत शोरूमचे व्यवस्थापक पंकजकुमार यादव (वय 36, रा. केसनंद रस्ता, वाघोली) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवेचा येरवडा कारागृहात खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव खराडी बाह्यवळण मार्गावरील (Kharadi)पीटर इंग्लड स्टोअरवर व्यवस्थापक आहेत. ख्रिसमसच्या पहाटे स्टोअर बंद असताना चोरट्यांनी स्टोअरचे शटर उचकटून आत प्रवेश केला.

 

यावेळी त्यांनी गल्ल्यातील 41 हजार 187 रुपये आणि 4 लाख 15 हजार 11 रुपयांचे शर्ट, पॅण्ट असे कपडे चोरून नेले. चोरट्यांनी वस्त्रदालनातून 4 लाख 64 हजार 198 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.