Koregaon Bhima : कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त 4 हजार 916 पोलिसांचा असणार कडेकोट बंदोबस्त

एमपीसी न्यूज – गेल्या वर्षी कोरेगाव भीमा विजयस्तंभ (Koregaon Bhima)शौर्यदिनानिमित्त अभिवादन सोहळ्यात गतवर्षी सुमारे 12 लाख अनुयायी सहभागी झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अनुयायांच्या संख्येत 25 टक्क्यांहून अधिक वाढ होणार आहे.

त्यामुळे यंदा पुणे पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव दल असा सर्वांचा मिळून 4 हजार 916 जणांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.

याबाबतची माहिती देण्यासाठी पुण्याचे (Koregaon Bhima)पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी (दि.28) पत्रकार परिषद घेतली.यावेळी प्रभारी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख उपस्थित होते.

आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, हा अभिवादन सोहळा उत्साहात आणि शांततेत पार पडण्यासाठी शहर पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण आयुक्त, ‘बार्टी’चे महासंचालक, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेण्यात आल्या.

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवेचा येरवडा कारागृहात खून
या सर्व विभागांच्या समन्वयातून योग्य नियोजन करण्यात आले आहे. अभिवादन सोहळ्यादिवशी पोलिसांकडून सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. सोहळ्यादरम्यान ड्रोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ शहर पोलिसांकडून सहा ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभिवादन सहोळ्यासाठी पुढील प्रमाणे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस आयुक्त-1, पोलिस सहआयुक्त- 1, अतिरिक्त आयुक्त-4, पोलिस उपायुक्त- 11, सहायक आयुक्त- 42, पोलिस निरीक्षक- 86, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक- 271, पोलिस कर्मचारी- 3 हजार 200, होमगार्ड- 700, राज्य राखीव पोलिस दल जवान 600 असा एकूण 4 हजार 916 जणांचा बंदोबस्त असणार आहे.याबरोबरच पोलिसांची सोशल मिडीयावर ही करडी नजर असणार असून सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सायबर गुन्हे शाखेकडून सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येत आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज असले तरी नागरिकांनीही सामाजत तेढ पसरवेल असे कोणत्याही गोष्टी करु नयेत, तसेच काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्कसाधावा असे आवाहन देखील पुणे पोलिसांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.