Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवेचा येरवडा कारागृहात खून

एमपीसी न्यूज – कारागृहात असलेला पिंपरी-चिंचवड (Chinchwad) शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवे याच्यावर कात्रीने हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. येरवडा कारागृहात सर्कल क्रमांक दोनमधील बरॅक क्रमांक एकच्या आवारामध्ये गुरुवारी (दि. 28) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असल्याचे समोर आले आहे.

महेश महादेव चंदनशिवे (वय 31, रा. घरकुल, चिखली), असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अनिकेत समदूर (वय 23, रा. घरकुल, चिखली), महेश तुकाराम माने (वय 24), गणेश हनुमंत मोटे (वय 24, दोघेही रा. सांगवी), आदित्य संभाजी मुरे अशी संशयितांची नावे आहेत.

दरोड्याची तयारी करणे आणि अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी 2022 मध्ये महेश चंदनशिवे याच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो गेल्या वर्षभरापासून कारागृहात होता. दरम्यान, इतर चौघे संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. पूर्ववैमनस्यातून चौघा संशयितांनी महेश चंदनशिवे याच्यावर केस कापण्याच्या कात्रीने व दरवाजाच्या बिजागिरीचा तुकड्याच्या साह्याने मानेवर व पोटाच्या बाजूला मारून हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने चंदनशिवे याला कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससून सर्वोपचार रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

TDR : …तर ‘टीडीआर’मधून माघार, आयुक्तांची भूमिका

मृत महेश चंदनशिवे याच्यावर पिंपरी, चिखली आणि भोसरी या पोलीस ठाण्यांमध्ये 2013 ते 2022 या कालावधीत 12 गुन्हे दाखल करण्यात आले. खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्नीशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दराेडा घालणे, चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते. दरोड्याची तयारी करून अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (Chinchwad) दाखल गुन्ह्यात महेश चंदनशिवे हा 30 नोव्हेंबर 2022 पासून येरवडा कारागृहात सर्कल क्रमांक दोन, बरॅक क्रमांक एकमध्ये बंदी होता.

सांगवी येथील गणेश मोटे याची गुन्हेगारी टोळी आहे. तो टोळीचा प्रमुख असून महेश माने हा टोळीतील सदस्य आहे. मोटे आणि माने हे दोघेही सांगवी येथील योगेश जगताप खून प्रकरणातील संशयित आहेत. तसेच फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. मोकांतर्गत ते कारागृहात आहेत. तर अनिकेत समदूर हा पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2022 मध्ये झालेल्या एका खून प्रकरणात तो वर्षभरापासून कारागृहात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.