Today’s Horoscope 29December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग -Today’s Horoscope 29December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्यआजचे पंचांग-

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख 29.12.2023.

शुभाशुभ विचार- वैधृती वर्ज्य.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – पुष्य.

चंद्र राशी – कर्क.
—————————–
मेष – ( शुभ रंग – मोरपंखी)
आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

वृषभ ( शुभ रंग- पांढरा)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

मिथुन – ( शुभ रंग- लाल)
आर्थिक बाजू आज भक्कम असल्याने सर्व कामे सुरळीत पार पडतील. सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील.

कर्क – ( शुभ रंग – आकाशी)
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळण्याचा प्रयत्न कराल.
सिंह -( शुभ रंग – सोनेरी)
आज मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. प्रवास कार्य साधक होतील. आज कंजूषपणा न करता काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत.

कन्या – ( शुभ रंग- राखाडी)
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की मिळेल.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी)
आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज आपल्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

वृश्चिक ( शुभ रंग – गुलाबी)
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ 100% राहील. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी असेल. नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

धनु (शुभ रंग- जांभळा)
जे चाललंय ते छानच चाललंय. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह धरू नका. धाडसाची कामे आज टाळली तर बरे होईल. आज सासुरवाडीकडून एखादा लाभ होऊ शकतो.

मकर- ( शुभ रंग – निळा)
वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदाराला दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी कराल.

कुंभ – (शुभ रंग- क्रीम)
तुमच्या सामाजिक प्रतिष्ठित वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस असेल. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. आज गृह सौख्याचा दिवस.

मीन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. हातचे सोडून पळत्या मागे धावावेसे वाटेल. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.