Chinchwad News : चापेकर चौक ते गेट वे ऑफ इंडिया सायकल रॅली काढून शहिदांना श्रद्धांजली

एमपीसीन्यूज : चिंचवड येथील इको पेडलर्स या ग्रुपच्या वतीने चिंचवड चापेकर चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत सायकल रॅली काढून आज, गुरुवारी 26/11तील शहिदांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.

चिंचवड येथील इको पेडलर्स या ग्रुपच्या वतीने 40 कार्यर्त्यांनी बाबा भोईर यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. बारा वर्षाच्या मुला-मुलींपासून ते 65 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.

विशेष बाब म्हणजे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या सायकल रॅलीत सहभाग घेऊन लोणावळ्यापर्यंत सर्वांना साथ दिली.

बुधवारी (ता. 25) रात्री अकरा वाजता चिंचवडगावातील चापेकर चौकात खासदार श्रीरंग बारणे यांनी हिरवा झेंडा फडकाविल्यानंतर या रॅलीस सुरुवात झाली. गुरुवारी (ता. 26) सकाळी आठ वाजता 40 सायकलस्वारांचे पथक 150 किलोमीटर अंतर पार करून गेट वे ऑफ इंडियाला पोहोचले.

तेथील स्मृती स्थळाला सर्वांनी फुले वाहून 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना शहिदांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली.

या सायकलवीरांमध्ये माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे बंधू किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्यासह अकलुजचे सहा जण, चिंचवड येथील बारा वर्षाची दुर्गा मिरजकर तर 65 वर्षाचे पांडुरंग म्हस्के यांनी उत्साहाने भाग घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.