Chinchwad News : एल्प्रो सिटी स्वेअर ‘वनपल्स नाॅर्ड’ स्पर्धेच्या अस्मिता मोघे ठरल्या पहिल्या विजेता

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्वेअर मॉलमध्ये आयोजित ‘वनपल्स नाॅर्ड’ या स्पर्धेच्या अस्मिता मोघे या पहिल्या विजेता ठरल्या आहेत. मोघे यांना वनपल्स कंपनीचा नाॅर्ड हा स्मार्टफोन बक्षिस म्हणून देण्यात आला.

एल्प्रो सिटी स्वेअर मॉलमध्ये ‘अनलाॅक जिंदगी’ ही थिम राबवली जात आहे. याअंतर्गत विविध आंतरराष्ट्रीय ब्रँडस् आणि त्यावर वेगवेगळी सूट देण्यात आली आहे. मॉलमध्ये सध्या ‘वनपल्स नाॅर्ड’ या स्पर्धेत सहभागी होऊन वनपल्स कंपनीचा नाॅर्ड हा स्मार्टफोन जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.

अस्मिता मोघे यांनी सुद्धा या स्पर्धेत सहभागी होत पहिला विजेता होण्याचा मान मिळवला आहे.

* तुम्हालाही जिंकता येईल ‘वनपल्स नाॅर्ड’

तुम्हालाही वनप्लस नाॅर्ड जिंकायचा असेल तर एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल मध्ये कुठे ही 9999 रुपयांची शॉपिंग करा. लकी ड्रॉच्या माध्यमातून दर आठवड्याला एका भाग्यवान विजेत्याला ‘वनपल्स नाॅर्ड’ जिंकायची संधी मिळणार आहे.

* ‘वनपल्स नाॅर्ड’ मध्ये काय आहे विशेष ?

वन प्लस ही मोबाईलची एक नामांकित कंपनी असून त्यांनी नुकताच ‘वनपल्स नाॅर्ड’ हा नवीन मोबाईल फोन लाॅन्च केला आहे. या स्मार्टफोन मध्ये ड्युएल सेल्फी कॅमेरा, अल्ट्रा फास्ट स्नॅप ड्रॅगन प्रोसेसर अमोलेड डिस्प्ले आणि ऑक्सिजन ओएस देण्यात आली आहे.

शासनाने माॅल सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर सुरक्षेची सर्व काळजी घेऊन एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाचे तापमान तपासले जाते, मॉलमध्ये सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन केले जाते, वेळोवेळी फ्लोअर तसेच वारंवार स्पर्श होणाऱ्या पुष्ठभाग सॅनीटाईज केले जातात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मॉलमध्ये सर्व काळजी घेतली जात आहे.

एल्प्रो सिटी स्वेअर मॉल मध्ये तुमला आवश्यक सर्व वस्तूंची खरेदी करता येते. विशेषतः या काळात विविध आंतरराष्ट्रीय ब्रँडवर सूट देण्यात आली आहे. तेव्हा मनमुराद शॉपिंग करत जिंदगी अनलॉक करण्यासाठी एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलला एकदा अवश्य भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.