Chinchwad news: पंडीत दीनदयाळ जंयती सेवासप्ताहा निमित्त एलईडी बल्बचे वाटप

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांचा प्रभाग 17 मध्ये उपक्रम

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक आणि संघटक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहात सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यावतीने आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत प्रभाग 17 मध्ये एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले.

प्रभाग 17 मधील चिंतामणी चौकातील जनसंपर्क कार्यालयात दि. 29 व 30 सप्टेंबर रोजी हा दोन दिवसीय उपक्रम राबविला जात आहे. सनलाईट कंपनीचे पाच हजार  एलईडी बल्ब सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार आहे. मेक इन इंडीयाच्या पार्श्वभुमीवर व्होकल ते लोकल असा आत्मनिर्भर भारत होण्यासाठी आपल्या जवळच्या नव उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे.

प्रभागातील नागरिकांना प्रत्येक वीज बिलानुसार दोन असे प्रति 20 रुपये या सवलतीच्या दराने दोन हजार पाचशे एलईडी बल्ब पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी, भाजपा शहर चिटणीस बिभीषण चौधरी, चिंचवड –किवळे मंडलाचे सरचिटणीस प्रदिप पटेल, प्रभाग अध्यक्ष् भगवान निकम, किवळे मंडल चिटणीस संदीप पाटील, कामगार आघाडी उपाध्यक्ष शंकर पाटील, ओबीसी सेलचे अशोक बोडखे, योगेश महाजन, दिपक महाजन, रविंद्र पवार, शुभम ढाके आदी होते.

नामदेव ढाके म्हणाले की, ऊर्जाबचतीसाठी एलईडी बल्ब वापरण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेनुसार बल्बचे वितरण करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंना योग्य बाजारपेठ मिळवुन देण्याकरीता हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

देशातील तरुणांना आपला व्यवसाय व्होकल ते लोकल आणि लोकल ते ग्लोबल करण्यासाठी चालना देण्यात येत आहे. आत्मनिर्भर योजनतेतून नवीन उद्योग सुरू होतील. यामुळे बेरोजगार व्यक्तींना काम मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.