RSS : शहरात सोमवारी स्वयंसेवकांची मांदियाळी

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय (RSS )कार्यकारी मंडळाचे सदस्य भय्याजी जोशी आणि प्रांत संघचालक नाना जाधव यांच्यासह संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मांदियाळी सोमवारी (दि. 5 जानेवारी) चिंचवड येथे येणार आहे. शहरातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील स्वयंसेवकांसोबत भय्याजी जोशी संवाद साधणार आहेत.

संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य असलेले विनायकराव थोरात (RSS )यांच्या 75 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त संघाचे राज्यभरातील पदाधिकारी व स्वयंसेवक या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांसह विनायकराव थोरात यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. भाजपाचे अमोल थोरात यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले आहे.

Pune :प्रत्येक मुलात एक शास्त्रज्ञ दडलेला असतो!” – एकनाथ आव्हाड

संघाची प्रार्थना, कार्य, ध्येय याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच विनायकराव थोरात यांनी केलेले संघकार्य, घडवलेले स्वयंसेवक तसेच संघामुळे त्यांची झालेली जडणघडण याबाबत माहितीपटातून त्यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. स्वयंसेवकांशी संवाद साधत भय्याजी जोशी मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे स्वयंसेवकांची कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.