Chinchwad : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात विजयादशमी निमित्ताने पथसंचलन संपन्न

एमपीसी न्यूज – विजयादशमीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड (Chinchwad) शहरातील काही भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आज (मंगळवारी) पथसंचलन करण्यात आले आहे. सकाळी साडे सात पासून विविध ठिकाणाहून येथून पथ संचलनाला सुरुवात झाली.

राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्याने शहरात पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 25 ठिकाणी आकुर्डी, रावेत,हिंजवडी पूनावळे, वाकड थेरगाव, चिंचवड पूर्व – पश्चिम, पिंपरी, काळेवाडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, संत तुकाराम नगर, आळंदी, मोशी, संभाजी नगर, चिखली,आळंदी या भागात सकाळी तर देहू, देहूरोड, दिघी, चऱ्होली ,भोसरी, इंद्रायणी नगर भागात सायंकाळी नियोजित मार्गावर पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन उत्साहात संपन्न होत आहेत.

Maharashtra : मोठी बातमी! निलेश राणे यांनी घेतला राजकारणातून संन्यास

जय घोषाच्या तालावर हजारो स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेऊन (Chinchwad) सामूहिकतेचे दर्शन घडविले.विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी, लोकप्रतिनिधी विविध भागातील संचलनात सहभागी झाले होते.

ठिकठिकाणी नागरिकांनी उस्फूर्तपणे पुष्पवृष्टी , भारत माता की जयच्या जयघोषात रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भव्य स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.