Chinchwad News : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून (Chinchwad News) पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चिंचवड – विद्यानगर येथे घडली.

सोनाली विराज चितारे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर, विराज अजय चितारे (वय 24, रा. दत्तनगर, रामनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. सोनाली यांच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune News : महाराष्ट्र पोलीस मेगासीटीचे संस्थापक महंमदरफी खान यांचे निधन

 

आरोपी पती विराजने किरकोळ कारणावरून सोनाली यांना वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. मानसिक व शारीरिक त्रास देत कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून सोनाली यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फौजदार (Chinchwad News)सुर्यवंशी तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.