Pune News : महाराष्ट्र पोलीस मेगासीटीचे संस्थापक महंमदरफी खान यांचे निधन

एमपीसीन्यूज- लोहगाव पुणे येथील महाराष्ट्र पोलीस (Pune News) मेगासीटीचे मूळ संस्थापक तथा प्रथम सचिव महंमदरफी चांदसाहेब खान (वय 65 वर्षे) यांचे शुक्रवारी (24) पुण्यात हृदयविकाराच्या ( Pune News ) आजाराने निधन झाले. चार दिवसांपूर्वी फातिमानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार विवाहित बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. पत्रकार अमिन खान यांचे ते मावसभाऊ होत.

Talegaon Dabhade News : भरीव संशोधनातून मावळातील गड किल्ल्यांमधील रहस्यमय गोष्टींचा उलगडा होईल

राज्याच्या पोलीस दलात त्यांनी औरंगाबाद,पुणे आदि शहरात पोलीस निरीक्षक म्हणून 36 वर्षे सेवा केली. दरम्यान, पोलिसांना हक्काची घरे मिळावीत म्हणून त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थेची ( Pune News ) स्थापना केली. औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि पुणे लोहगाव येथील सुमारे 800 कोटीं रुपयांचा महाराष्ट्र पोलीस मेगासीटी प्रकल्प त्यांनी पोलीस, गृह आणि न्यायालयीन विभागातील आजी माजी कर्मचाऱ्यांसाठी आग्रहाने स्थापित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.