Crime News : सुरक्षा रक्षकास कामगारांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – मोबाईल चेकिंगमध्ये पकडल्याच्या (Crime News ) रागातून चार कामगारांनी कंपनीतील सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता महाळुंगे येथील एच पी चौकात घडली.

ध्रुवकुमार नवलकिशोर तिवारी (वय 35, रा. निघोजे, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश सुभाष वाघ आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : महाराष्ट्र पोलीस मेगासीटीचे संस्थापक महंमदरफी खान यांचे निधन

फिर्यादी तिवारी हे सुरक्षा एजन्सीतर्फे महाळुंगे येथील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. कंपनीत येणाऱ्या कामगारांची चेकिंग करताना तिवारी यांना एका कामगाराचा मोबाईल फोन सापडला होता. त्याचा राग कामगार आकाश वाघ याच्या मनात होता.

तिवारी काम संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घरी जात होते. ते एच पी चौकात आले असता आकाश वाघ त्याच्या तीन साथीदारांसोबत आला. चेकिंग मध्ये मोबाईल फोन पकडल्याच्या कारणावरून तिवारी यांना चामडी पठ्ठा आणि ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.