Chinchwad : पिंपरी-चिंचवडला मिळाले आणखी दोन पोलीस उपायुक्त

एमपीसी न्यूज – राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड (Chinchwad) शहराला एक अपर आयुक्त आणि दोन उपायुक्त या पदांना मंजुरी दिली होती. त्यानंतर आता दोन पोलीस उपायुक्तांची बदली पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश राज्य शासनाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांनी दिले आहेत.

Shirgaon : उत्तेजक इंजेक्शन विक्री प्रकरणी दोघांना अटक

युसीटीसी फोर्स वन मुंबई येथे पोलीस अधीक्षक असलेले संदीप डोईफोडे आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे अपर पोलीस अधीक्षक असलेले शिवाजी पवार या दोन अधिकाऱ्यांची पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.