Pratibha college : प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रम

एमपीसी न्यूज – चिंचवड मधील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने बाल दिनाचे औचित्य साधून स्टुडन्ट वेल्फेअर कमिटी अंतर्गत “एक हात मदतीचा ” हा उपक्रम राबविला. (Pratibha college) यासाठी प्राध्यापक जास्मिन फरास व प्राध्यापक तृप्ती बजाज यांनी पुढाकार घेऊन विकास अनाथ आश्रम चिखली येथे भेट दिली होती.

यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या उप प्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे, समन्वयीका प्रा. सुनिता पटनाईक व समनवयिका प्रा. जास्मिन फरास, प्रा.तृप्ती बजाज , प्रा. समिता शिंदे ,प्रा.रघुनाथ ताम्हाणे, प्रा.चिन्मय जैन आणि 11 वी 12 वी चे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Padmalata Award : ‘पद्मलता’ पुरस्कार मधुरा बडवे, निवेदिता मेहेंदळे यांना जाहीर

“‘एक हात मदतीचा निराधारांसाठी” या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांनी धान्य डाळी, अन्य किराणा, शीतपेय, खाऊ, आणि अनेक गरजू वस्तू अशा विविध स्वरूपात (Pratibha college) या अनाथ चिमुकल्यांना मदतीचा हात दिला.या उपक्रमास संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा व प्राचार्य डॉ बाबासाहेब सांगळे यांनी प्रोत्साहन दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.