Padmalata Award : ‘पद्मलता’ पुरस्कार मधुरा बडवे, निवेदिता मेहेंदळे यांना जाहीर

एमपीसी न्यूज – कीर्तन परंपरा 25 वर्षांहून अधिककाळ (Padmalata Award) वृद्धिंगत करून कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल दिला जाणारा मानाचा ‘पद्मलता’ पुरस्कार हा सन 2021 व 2022 साठी अनुक्रमे ह भ प मधुरा बडवे आणि ह भ प निवेदिता मेहेंदळे यांना जाहीर करण्यात आला आहे. महावस्त्र, मानपत्र व दक्षिणा असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदाचे 4 थे वर्ष आहे. अशी माहिती हरीकीर्तनोत्तेजक सभेचे अध्यक्ष, कीर्तनकलानिधी ह. भ. प. रामचंद्रबुवा भिडे यांनी पत्रकाद्वारे दिली.

हा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दि 19 नोव्हेंबर रोजी सायं. 5.30 वा, : श्री नारद व्यास मंदिर, भिकारदास मारुती मंदिरामागे सदाशिव पेठ, पुणे येथे संपन्न होईल. श्रीहरिकीर्तनोत्तेजक सभा, पुणेचे उपाध्यक्ष ह.भ.प. डॉ. विलासबुवा पटवर्धन हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, मुंबईचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.श्री. राजेंद्रबुवा मांडेवाल हे या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच यानंतर त्यांचे कीर्तन देखील संपन्न होईल. या वेळी योगेश देशपांडे (तबला) आणि साहिल पुंडलिक (हार्मोनियम) हे (Padmalata Award) वाद्यसंगत करतील.

Pune book festival : ‘पुणे जिल्हा ग्रंथोत्सव 2022’ चे उद्घाटन

याच्या आदल्या दिवशी शुक्रवार 18  नोव्हेंबर रोजी सायं 6 वा ह भ प मृदुला सबनीस यांचे कीर्तन श्री नारद व्यास मंदिर येथेच संपन्न होईल. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे निमंत्रण संयोजक कीर्तनकलानिधी ह भ प रामचंद्रबुवा भिडे आणि ह भ प मुक्ता मराठे यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.