Chinchwad : मसापची दिवाळी काव्य पहाट उत्सवात अक्षरवेध दिवाळी अंकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध स्व. गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या (Chinchwad) सुकन्या कविता आणि अंगाई खेबुडकर या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडची दिवाळी पहाट “मसापच्या शांता शेळके सभागृह निगडी येथे संपन्न झाली.यावर्षी गीतकार जगदीश खेबुडकर यांचे व्यक्तिमत्व व साहित्यावर आधारित असलेला दिवाळी अंक “अक्षरवेध”चे प्रकाशन, कविता व अंगाई खेबुडकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी उद्योगपती ओमप्रकाश पेठे, मकरंद बापट, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ, कार्यवाह संजय जगताप, श्याम लेले, संदीप राक्षे, उपस्थित होते.

एक एक दीप लावत सुरु झालेल्या ” काव्य रंगे उष: काल संगे ” या कविसंमेलनात अशोक कोठारी, हेमंत जोशी, प्राची देशपांडे, शशिकला देवकर, योगिता कोठेकर, प्रतिमा काळे, सुलभा सत्तुरवार, रघुनाथ पाटील, किरण वैद्य, दिलीप मराठे, जयश्री थोरवे, अंजली नवांगूळ, सुनिता बोडस, दत्तू ठोकळे, आशा नष्टे, रेखा कुलकर्णी, सुभाष चटणे, शोभा जोशी, नागेश गव्हाड, प्रसन्न निळेकर, बबन धुमाळ, आत्माराम हारे, प्रसन्न धुमाळ, दिनेश भोसले शरद शेजवळ, रश्मी थोरात आदी कविंनी सहभाग घेऊन आपल्या वैविध्यपुर्ण रचना सादर केल्या.

Mahavitaran : महावितरणमधील अपंग कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अधीक्षक अभियंत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

दोघींनीही आपले मनोगत व्यक्त करतांना 2011 साली झालेल्या (Chinchwad) खेबुडकरांच्या निधनानंतर 12 वर्षानी त्यांच्यावर प्रथमच दिवाळी विशेषांक काढून रसिकांच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे विशेष आभार मानून आनंद व्यक्त केला. पेठे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात “चालता बोलता” या विशेष प्रश्नमंजुषा मध्ये नंदकुमार मुरडे आणि मानसी चिटणीस यांनी साहित्यावर आधारित प्रश्न विचारुन साहित्यिक व रसिकांना बोलते केले.
गायक अनया देसाई, रिचा राजन, अविनाश पाठक, सुनंदा शिंगणाथ यांनी गाणी सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

श्रीकांत जोशी, किरण लाखे, प्राची कुलकर्णी, किशोर पाटील, किरण जोशी, जयश्री श्रीखंडे यांनी संयोजन केले.राजन लाखे यांनी प्रास्तविक केले. संजय जगताप यांनी सुत्रसंचालन केले तर डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.