World Cup 2023 – दक्षिण आफ्रिकेचा विजय; अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात

एमपीसी न्यूज – विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून (World Cup 2023) बांगलादेश, इंग्लंड , श्रीलंका, नेदरलँड यांच्यासह अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आफ्रिके विरुद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने आफ्रिकेला कडवी झुंज दिली. अंतिमतः आफ्रिकेने अफगाणिस्तान वर पाच गडी राखून विजय मिळवला. यापूर्वीच आफ्रिका संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून त्यांचा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. अफगाणिस्तान वरील विजयामुळे आफ्रिकेच्या आत्मविश्वासात भर पडली.

विश्वचषकापूर्वी दुबळी समजली जाणारी अफगाणिस्तानच्या टीमने विश्वचषकात दमदार कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांमध्ये शानदार कामगिरी करत सर्वांच्या मनावर छाप सोडली.

विश्वचषकातील नऊ सामन्यांमध्ये चार विजय आणि पाच पराभव सह आठ गुण त्यांच्या नावे आहेत.

अफगाणिस्तानचा कर्णधार अब्दुल्लाह ओमरजही 97 धावा त्याने दिलेली एकाकी झुंज आणि रहमत व नूर यांनी केलेली प्रत्येकी 26 धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने आफ्रिकेला 245 धावांचे लक्ष्य दिले.

Chinchwad : मसापची दिवाळी काव्य पहाट उत्सवात अक्षरवेध दिवाळी अंकाचे प्रकाशन

या लक्षाचा पाठलाग करताना आफ्रिकेला अफगाणिस्तानशी झुंजावे (World Cup 2023) लागले. अफगाणिस्तानने आफ्रिकेला शेवटच्या षटकांपर्यंत खेळ घेऊन जाण्यास भाग पाडले.

व्हेन दे दसन यांनी केलेल्या 76 धावांच्या खेळीमुळे आफ्रिकेने अफगाणिस्तान वर पाच गडी राखून विजय मिळवला. क्विंटन डी कॉक 41 धावा अंडील 39 धावा यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. या विजयासह आफ्रिकेच्या नावे 9 सामन्यात सात विजयांसह 14 गुण जमा आहेत.

गुणतालिकेत आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर असून उपांत्य फेरीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.