Chinchwad : हप्त्याची मागणी करत कॅब चालकाला धमकी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई अशी (Chinchwad) गाडी चालवायची असेल, तर हप्ता दे म्हणत खासगी कॅब चालकाला धमकी देण्याची घटना घडली. ही घटना चिंचवड स्टेशनजवळ रविवारी (दि.9) घडली. 
संजय ज्ञानोबा वाघमारे (वय 40, तळवडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून निगडी पोलिसांनी विनोद उर्फ विन्या देवेंद्र कामत (वय 42, रा.तळवडे) व उदय उर्फ सर्वोदय शेट्टी (वय 48, रा.चिंचवड) याना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पुणे मुंबई प्रवासी वाहतूकचा धंदा करतात. रविवारी फिर्यादी यांनी त्यांच्या कॅबमध्ये प्रवासी भरले म्हणून आरोपींनी त्यांना कोणाला विचारून प्रवासी भरले. 300 रु. काढ म्हणून दरडावले. यावेळी फिर्यादीने याला नकार दिला असता, तुला गाडी चालवायची असले तर आम्हाला 300 रु. द्यावेच लागतील नाही तर तुला बघून घेईन अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.